शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले यांची सोशल मीडियावरून बदनामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 12:45 IST

आरोपींनी रामदास आठवले यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले...

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड : चार जणांविरोधात गुन्हा दाखल 

पिंपरी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केली. तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी (दि. ७) सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन घोलप, बाळासाहेब शिंदे, दिनकर तेलंग व कैलास कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुधाकर विश्वनाथ वारभुवन (वय ५९, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वारभुरवन आरपीआय (आठवले गट) या पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत. आरोपींनी रामदास आठवले यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. जाहीर निषेध, जाहीर निषेध, असा मेसेज टाकला. यातून आठवले यांची बदनामी केली. तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. त्यामुळे आरपीआयचे शहराध्यक्ष वारभुवन यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.एका कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी विडंबनात्मक काव्य सादर केले होते. यातून एका समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगून नाराजी व्यक्त करण्यात आली. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर, त्याबाबत दिलगीरी व्यक्त करून आठवले यांनी माफी मागितली होती. तसेच आरपीआय (आठवले गट) या पक्षातफेर्ही त्याबाबत दिलगीरी व्यक्त करण्यात आली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आठवले यांचा हेतू नव्हता, असे त्यावेळी पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. असे असतानाही सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्याचा प्रकार समोर आला आहे. 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही जणांकडून जाणूनबुजून असे कृत्य केले जात आहे. यामागे राजकीय हेतू आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबाबत पक्षाचे अध्यक्ष आठवले यांनी स्वत: माफी मागितली आहे. तसेच पक्षाकडूनही दिलगीरी व्यक्त केली आहे, असे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाRamdas Athawaleरामदास आठवले