गॅसच्या भडक्यात महिलेचा मृत्यू, पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 22:05 IST2018-04-10T22:05:08+5:302018-04-10T22:05:08+5:30
सिलेंडरच्या गळतीमुळे गॅसचा भडका उडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरीतील आंबेडकर कॉलनीत घडली.

गॅसच्या भडक्यात महिलेचा मृत्यू, पिंपरीतील घटना
पिंपरी : सिलेंडरच्या गळतीमुळे गॅसचा भडका उडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरीतील आंबेडकर कॉलनीत घडली. गीता जगताप (वय ५५, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे आगीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गीता जगताप आंबेडकर कॉलनीमध्ये पहिल्या मजल्यावर राहत होत्या दुपारी गॅस सिलेंडरचा व्हॉल्व उघडा राहिला. गळती होऊन गॅस घरात पसरला. गीता घरी एकट्याच होत्या. गॅस गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास गॅस पेटविण्याचा प्रयत्न केला असता, घरात पसरलेल्या गॅसचा भडका उडाला. घराला आग लागली. संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, घराला आग लागल्याने गीता यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. पिंपरी पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.