स्वाइन फ्लूने दोघींचा मृत्यू, एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:39 IST2017-09-06T23:39:08+5:302017-09-06T23:39:17+5:30

स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात स्वाइन फ्लूने एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाला. मागील आठ महिन्यांत पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३९ झाली आहे.

Death of two women by swine flu, two women die on the same day | स्वाइन फ्लूने दोघींचा मृत्यू, एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू

स्वाइन फ्लूने दोघींचा मृत्यू, एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू

पिंपरी : स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात स्वाइन फ्लूने एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाला. मागील आठ महिन्यांत पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३९ झाली आहे.
पिंपळे सौदागर येथे राहणाºया ३५ वर्षीय महिलेला ३१ आॅगस्टला स्वाइन फ्लूूची लक्षणे आढळून आल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला स्वाइन फ्लूूपूर्वी न्यूमोनियाचा देखील आजार होता. उपचार सुरू असताना मंगळवारी तिचा मृत्यू झाला. तसेच खेड येथील ३० वर्षीय महिलेला २ सप्टेंबरला स्वाइन फ्लूूची लक्षणे आढळून आली होती.

Web Title: Death of two women by swine flu, two women die on the same day