पिंपरी : डांगे चौक ते काळेवाडी या उड्डाणपुलावर मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरोधात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत यशवंत कांबळे (वय २८, रा. सिद्धार्थ नगर, दापोडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत दुचाकीवरून जगताप डेअरी चौकाकडे जात होता. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका मोटार चालकाने श्रीकांतच्या दुचाकीला धक्का दिला. हा अपघात १० आॅक्टोबरला झाला होता. यामध्ये श्रीकांतला दुखापत झाली. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या दापोडीतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:33 IST
उड्डाणपुलावर मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या श्रीकांत यशवंत कांबळे या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या दापोडीतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
ठळक मुद्देओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका मोटार चालकाने श्रीकांतच्या दुचाकीला दिला होता धक्काया प्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल