शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे महिन्यात सख्या भावांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 1:44 PM

थेरगाव परिसरात अस्वच्छतेमुळे डेंगूसह अन्य रोगांचे थैमान

ठळक मुद्देमणियार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर : नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी नेजचे खड्डेही अर्धवट सोडण्यात आल्याने घाणीचे साम्राज्य महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

वाकड : महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे पडवळनगर थेरगाव परिसरात डेंगूचे रुग्ण आढळत आहेत येथील सख्या भावांचा एका महिन्यात डेंगूने अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला आहे. तसेच या घटनेला जबाबदर असणाऱ्या महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 उजेर हमीद मणियार (वय ४, रा. पडवळनगर, थेरगाव) या चिमुकल्याचे शुक्रवारी (दि १३) पहाटे ४ वाजता मृत्यू झाला तर त्याचाच ९ महिन्याचा लहान भाऊ अदनान हमीद मणियार याचा १६ नोव्हेंबर रोजी दुदैवी अंत झाला. महिना उलटण्याच्या आतच एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नागरिक हळहळ करत आहेत. तर चिमुकल्याचे वडील हमीद मानियार व आई रिजवाना यांची देखील बिकट अवस्था झाली आहे. याच परिसरात गेल्या आठवड्यात आणखी एका तरुणाला डेंगूची लागण झाली होती. तर मणियार यांच्या मोठ्या भावाची ३ वषार्ची मुलगी देखील तापाने फणफणली आहे.       या परिसरात गेल्या आठ महिन्यापूर्वी जुने पिण्याच्या पाण्याचे पाईप काढून नवीन टाकण्यात आले मात्र हे काम करताना जुने कनेक्शन मात्र आहे त्या अवस्थेत सोडण्यात आले त्यामुळे एकीकडे येथे अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्याचे डबके साचूननागरिकांसाठी घातक अशा डेंग्यूची उत्पत्ती होत आहे तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. तर ड्रेनेजचे खड्डेही अर्धवट सोडण्यात आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 

       पडवळ नगर, दगडू पाटील नगर वहीनी साहेब कॉलनी यासह हा प्रभाग क्रमांक २३ चा सुमारे २० हजार लोकसंख्येचा परिसर येथे सर्वजण मध्यम वर्गीय आणि मोलमजुरी करणारे नागरीक वास्तव्य करतात. मात्र, या परिसरात महापालिकेचे आणि स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याचे सांगत अनेकदा तक्रारी करूनही याभागात धुरीकरण, साफ सफाई, झाडू, ड्रेनेज व गटार स्वच्छता कचऱ्याची विल्हेवाट आदी कामे केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी संतप्त नातेवाईकांसह जमावाने केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलdengueडेंग्यूDeathमृत्यू