शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तालुक्यातील बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 14:18 IST

घरातील पाणी संपल्याने संतोष आणि आर्यन हे नातेवाईकांसह पवना नदीवर पोहण्यासाठी गेले होते..

ठळक मुद्देपवना नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती शुक्रवारी दुपारी

शिरगाव : बेबेडओहोळ (ता. मावळ) येथे पवना नदीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( ता.१) रोजी दुपारी 12 च्या सुमारास घडली. बुडालेल्या तरुणांपैकी एकाचा मृतदेह शुक्रवारीच तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी आढळून आला. संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय ३२, रा. जवळ, मुळशी) व आर्यन दीपक आलम (वय १३, रा. बेबडओहोळ) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. हे दोघे काल सकाळी साडेअकराच्या सुमारास नातेवाईकांबरोबर पवना नदीवर पोहायला गेले होते. त्यावेळी ते पाण्यात बुडाले. यातील संतोष घारे यांचा मृतदेह काल हाती लागला तर आर्यनचा मृतदेह शनिवारी(दि.२) सकाळी ६.५० च्या सुमारास आढळून आला. घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर पवना नदीच्या पात्रात आर्यनचा मृतदेह दिसल्याची खबर मंगेश घारे यांनी शिरगाव पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला.संतोष हा विवाहित असून एक दिवसापूर्वी तो बेबडओहोळ येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. घरातील पाणी संपल्याने संतोष आणि आर्यन हे नातेवाईकांसह पवना नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पोहोताना दोघेही पाण्यात बुडाले.याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग पथक लोणावळा आणि मारूंजी येथील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मंडळाचे अग्निशामक दल तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकांनी दोघांचा शोध घेतला. त्यावेळी संतोषचा मृतदेह लगेच सापडला. मात्र, आर्यनचा शोध लागला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते. अखेर आज सकाळी घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळला. शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत..

टॅग्स :shirgaonशिरगावmavalमावळDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे