शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

मोशी कचरा डेपोमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, डंपरच्या साह्याने उचलला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 10:19 IST

कोरोनामुळे मृतदेह उचलण्यासाठी कुणी तयार होईना..

ठळक मुद्देमृतदेहाची ओळख पटलेली नाही

मोशी: येथील कचरा डेपो मध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक मृतदेह आढळला असल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली आहे.कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेह उचलण्यास पुढे कुणी येत नसल्याने शेवटी डंपरच्या साह्याने तो मृतदेह उचलण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभर आलेल्या गाड्याचे डंपिंग करण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने सुरू होते. हे काम चालू असताना जेसेबी चालकाला कचऱ्यात काही तरी असल्याचे लक्षात आले असता त्यांनी कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर त्या ठिकाणी मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. मृतदेहाची ओळख पटलेली नाही.मृतदेह दिसत असतानाही कोरोनाच्या भीतीने मृतदेह बाजूला काढण्यास भीती वाटत होती.

मोशीतील कचरा डेपोमध्ये संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकण्यात येत असतो.शहराचा ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. हा कचरा गोळा करण्याचे काम दोन बड्या कंपन्यांना देण्यात आले आहे. तर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईतील अँथनी लारा इन्व्हयरो प्रा ली कामकाज आहे. कचरा डेपोमध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.कचरा डेपोत येणाऱ्या प्रत्येक गाडीची चौकशी करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची आहे. असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुढील तपास भोसरी एम आय डी सी पोलीस करत आहेत.

 

टॅग्स :moshiमोशीDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस