शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

विद्यार्थ्यांचा होडीतून धोकादायक प्रवास , पहिल्या दिवसापासूनच शाळेसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:25 IST

नाणोली व वराळे गावातील शेतकरी व महिलांबरोबर शाळेसाठी विद्यार्थ्यांना होडीतून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही या नदीवर पूल उभारला जात नसल्याने तीन पिढ्यांपासून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेसाठी कसरत करावी लागते.

- विजय सुराणावडगाव मावळ : नाणोली व वराळे गावातील शेतकरी व महिलांबरोबर शाळेसाठी विद्यार्थ्यांना होडीतून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही या नदीवर पूल उभारला जात नसल्याने तीन पिढ्यांपासून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेसाठी कसरत करावी लागते. पावसाळ््यात इंद्रायणी नदीला पूर असल्यानंतर होडीतील प्रवासात धोक्याची शक्यता अधिक बळावते. शाळेच्या पहिल्या दिवसांपासून ही कसरत सुरू झाली आहे.मावळ तालुक्यातील अतिदुर्गम भागात नागरिकांना प्रवासासाठी रस्ते व पुलाची सुविधा नाही. त्यामुळे नाणोली गावच्या ग्रामस्थांना होडीशिवाय इंद्रायणीच्या अलीकडे-पलीकडे जाण्याचा दुसरा मार्गच नाही. नाणोली गावची लोकसंख्या सुमारे तेराशे आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. नाणोली, वराळे व इतर गावांतील मुले-मुलींना शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर अपिरहार्य आहे.नव्या होडीची आशावराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. सध्याची होडी निकामी झाली असून, नवीन होडी द्यावी, तसेच पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी माजी सभापती धोंडिबा मराठे, माऊली मराठे, विशाल लोंढे, अरुण लोंढे, संतोष लोंढे, मल्हारी कोंडे यांनी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी, जिल्हा परिषदेकडून नवीन नाव लवकर आणण्याचे आश्वासन दिले.तीन पिढ्यांचा व्यवसायसुरुवातील दत्तोबा गव्हाणे यांनी होडीतून प्रवासाचा व्यावसाय सुरू केला. त्यानंतर मुलगा बळीराम आणि सून बिबाबाई याही हाच व्यवसाय करीत आहेत. या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतले जायचे. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थ्यांची सेवा आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे.परंतु महागाईचे दिवस आहेत. नुसत्या धान्यावर घर चालत नाही. शासन वा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन दिले पाहिजे, असे बिबाबाई गव्हाणे यांनी सांगितले.पर्यायी व्यवस्थेची आवश्यकताइंद्रायणीच्या पलिकडे जाण्यासाठी असलेल्या होडीची अवस्था बिकट असून, तळाला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे होडीत काही प्रमाणात पाणी घुसते. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा व दोरखंड बांधले आहेत. त्या आधारे होडी ओढून पुढे नेली जाते. आता पावसाळा सुरू झाला आहे. अचानक पाऊस वाढल्यास नदीला पूर येतो, त्यावेळी आपत्कालीन व आणीबाणीच्या परिस्थिती प्रवाशांना वाचविण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था याठिकाणी नाही. नाणोली व वराळे ग्रामस्थांसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाeducationशैक्षणिक