शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

धरण परिसर असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 5:56 AM

लोणावळा परिसरातील भुशी धरण, लोणावळा व तुंगार्ली या धरणाचा पाणीसाठा संपत आला आहे.

लोणावळा : धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील धरणांमध्ये वारंवार होणारे पर्यटकांचे अपघात ध्यानात घेता या धरण परिसरांची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचे अधोरेखित होत आहे. मावळ तालुका व लोणावळा परिसरात निसर्ग, अल्हाददायीपणा, धरणे, किल्ले, लेण्या, मंदिरे असा हा समृद्ध परिसर देशभरातील पर्यटकांना साद घालत असतो. मुंबई व पुणे या दोन शहरांच्या मध्यावर हा तालुका असल्याने याठिकाणी पर्यटनाकरिता येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. महाविद्यालयीन तरुण, तरुणी, आयटीपार्कमधील अभियंते, मुंबई भागातील उच्चभ्रू यांची संख्या तुलनात्मक दृष्ट्या जास्त असते. मावळ परिसरात निसर्गाचा निख्खळ आनंद घेण्याऐवजी जीव धोक्यात घालत धरणाच्या पाण्यात उतरणे, दरीच्या तोंडावर जाऊन सेल्फी काढणे, गड किल्ल्यांवर धोकादायक ठिकाणी जाणे असे प्रकार करतात व मरणाला आमंत्रण देतात. सोमवारी पवनाधरण व लोणावळ्यातील वलवण धरणात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. यापैकी दोन जण अल्पवयीन होते. पवना धरणात दोन महिन्यांपूर्वी देखील दोन पर्यटकांना बुडून झाला होता. वारंवार धरण परिसरात या घटना घडत असताना त्यावर नियंत्रण राखण्यात यंत्रणांना अपयश येत आहे. मावळ तालुक्यातील काही धरणे ही पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतात तर काही टाटा कंपनीची खासगी धरणे आहेत. धरणांचा परिसर हा व्यापक असल्याने पर्यटक सुरक्षा जाळ्या भेदून पाण्यात उतरतात. अनेक वेळा पोहता येत नसताना देखील मित्रांच्या समवेत मौज म्हणून पाण्यात गेलेल्या अनेकांची मावळात प्राणज्योत मावळली आहे. खरं तर धरणाचा परिसर व बॅक वॉटरचा भाग पहाता यासर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नेमणे हे शक्य नसले तरी किमान सुरक्षा जाळ्या लावणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने देखील धरण भागात गस्त वाढवायला हवी.लोणावळा परिसरातील भुशी धरण, लोणावळा व तुंगार्ली या धरणाचा पाणीसाठा संपत आला आहे. तरी देखील पाण्यात युवा पर्यटक उतरतात पाण्याचा अंदाज येत नसल्याने चिखलात गुंततात व मृत्यूला कवटाळतात. पवना धरण तसेच वलवण धरणाच्या डोंगराकडील भागातून पर्यटक सुरक्षा यंत्रणेचाडोळा चूकवत पाण्यात उतरतात, जागेची अपुरी माहिती व पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने पर्यटक धरणात बुडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. 

टॅग्स :Damधरण