Curfew in some parts of Chinchwad village on the occasion of Angarki Chaturthi | पिंपरी- चिंचवड गावातील 'या' भागात संचारबंदी; अंगारकी चतुर्थीनिमित्त गर्दी होण्याची शक्यता

पिंपरी- चिंचवड गावातील 'या' भागात संचारबंदी; अंगारकी चतुर्थीनिमित्त गर्दी होण्याची शक्यता

पिंपरी : अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवड येथील श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर व मंगलमूर्ती वाडा परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतचे आदेश दिले. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून, निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. २) अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवड येथे चिंतामणी गणेश मंदिरात दर्शनासाठी तसेच महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी ८० ते ९० हजार भाविक हजेरी लावतात. मंगळवारी देखील अशी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांकडून जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री बारापर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

...या भागात संचारबंदी, जमावबंदी... 
चिंचवड गावातील पडवळ आळी, सुखकर्ता अपार्टमेंट चाैक, जिजाऊ पर्यटन केंद्र, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चाैक, मंगलमूर्ती वाडा परिसर, चिंतामणी गणेश मंदिर/मोरया यात्री निवास, मोरया प्रसाद हाॅल समोरील रस्ता, मोरया गोसावी मंदिर परिसरात संचारबंदी व जमावबंदी राहणार आहे.

Web Title: Curfew in some parts of Chinchwad village on the occasion of Angarki Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.