रस्ता ओलांडणे जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:56 IST2017-08-01T03:56:24+5:302017-08-01T03:56:24+5:30
पुणे-नाशिक महामार्गावर धावडे वस्ती तसेच सद्गुरुनगर भागात पादचाºयांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागत असून, या भागात शाळकरी मुले, महिला व वृद्ध नागरिकांची चांगलीच गर्दी असते.

रस्ता ओलांडणे जीवघेणे
भोसरी : पुणे-नाशिक महामार्गावर धावडे वस्ती तसेच सद्गुरुनगर भागात पादचाºयांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागत असून, या भागात शाळकरी मुले, महिला व वृद्ध नागरिकांची चांगलीच गर्दी असते. या भागात अनेकदा अपघात झाले असून, नागरिकांच्या जीवाला धोका आहे. पादचाºयांना सुरक्षितरित्या रस्ता ओलांडता यावा, यासाठी या भागात मुख्य दोन ठिकाणी भुयारी मार्ग अथवा पादचारी पूल उभारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
भोसरीकडून चाकणकडे जाणाºया मार्गावर इंद्रायणीनगर, धावडे वस्ती, तसेच एमआयडीसीकडे जाणाºया नागरिकांना पुणे-नाशिक महामार्ग ओलांडून जावे लागते. महामार्गावर वाहनांची कायम वर्दळ असल्याने आणि एकीकडे भोसरी उड्डाणपुलावरून वेगात येणारी वाहने आणि दुसरीकडे चाकणकडून येणाºया वाहनांना रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात होतात. तसेच या भागात पादचाºयांसाठी फुटपाथही नसल्याने पायी चालणाºयांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. असाच प्रकार सद्गुरुनगर परिसरातही आहे. या भागात भुयारी मार्ग बनवावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील नागरिकांनी लावून धरली आहे. पण अद्यापही त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसलयाने नागरिकांच्या जिवाकडे महापालिका प्रशासन व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर आणि पदपथांवर पादचाºयांना शासकीय अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. कित्येक बस थांबे थेट पदपथांवरच उभारण्यात आले आहेत. तसेच वीजवितरण कंपनीचे डीपी बॉक्स, ट्रान्सफॉर्मर यांसह महापालिकेची सेवा केंद्रे यांची अतिक्रमणे पदपथांवर झाली आहेत. ही शासकीय अतिक्रमणे असल्यामुळे ती दूर केली जात नाहीत, ही वस्तु:स्थिती आहे.
वॉर्डस्तरीय निधीतून शहरात नगरसेवकांमार्फत जी कामे केली जातात त्यात नगरसेवकांनी बहुतेक ठिकाणी जे बाक दिले आहेत ते पदपथांवर चक्क आडवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पादचाºयांचे मार्गच या बाकांनी अडवले आहेत. या बाकांच्या आधारे अनेक ठिकाणी अनधिकृत टपºया व छोटी हॉटेल सुरू झाली असून, हे बाक नगरसेवकांनी दिल्यामुळे तेथे कारवाई होत नाही.