शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तरुणावर कोयत्याने वार करुन रोकड लुटणारे आरोपी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 18:44 IST

तरुणावर कोयत्याने वार करुन रोकड लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला होता

पिंपरी : तरुणावर कोयत्याने वार करुन रोकड लंपास करणारया आरोपींचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. दोन अल्पवयीन मुलांसह एकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिपक नवनाथ बन (वय १९, रा. संत तुकारामनगर, दुगार्माता कॉलनी, भोसरी) याला अटक केली असून त्याचा साथीदार तुषार चव्हाण (वय १९, रा. भोसरी) हा फरार आहे. यासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १७ एप्रिलला शंभुलिंग चंद्रकांत कलशेट्टी (वय २९, रा. केशवनगर, कासारवाडी, भोसरी) हे दिघी परिसरातील पेवन कंपनीमध्ये डेली कलेक्शन करुन भोसरी-दिघी रोडवरुन दुचाकीने जात होते. दरम्यान, पाठीमागून दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी कलशेट्टी यांच्या दुचाकीला गाड्या आडव्या लावून त्यांच्या हातावर, डोक्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांच्याजवळील ८८ हजार ५०० रुपयांची रोकड घेवून पसार झाले.दरम्यान, हा गुन्हा भोसरी परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार २२ एप्रिलला दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून दिघी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता व दुचाकी जप्त केली. दरम्यान, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दिपक बन व तुषार चव्हाण यांचेसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.   बन व चव्हाण या आरोपींची माहिती काढली असता ते गुजरात येथे गेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक गुजरात व ठाणे येथे रवाना झाले. दरम्यान, आरोपींना याबाबतची माहिती मिळाल्याने आरोपी गुजरातमधून पसार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत असताना आरोपी दिपक बन हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घराच्या बाजूला सापळा रचला. त्यावेळी बन याला त्याच्या वडीलांच्या दुचाकीवरुन पळून जात असताना आळंदी येथे पकडले. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी ४९ हजार रुपयांची रोकड जप्त केली. दरम्यान, या गुन्ह्यातील तुषार चव्हाण याच्यासह इतर आरोपींचा शोध सुरु आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरिक्षक उत्तम तांगडे, सहायक निरिक्षक गणेश पाटील, कर्मचारी महेंद्र तातळे, सचिन उगले, गणेश सावंत, प्रवीण पाटील, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक