शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे गुरव येथील मंदिर दुर्घटनेप्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 12:22 IST

पिंपळे गुरव येथे नदीपात्रालगत शिवमंदिरासमोर सभामंडप उभारणीचे दगडी काम सुरू असताना, अचानक बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडून तीन मजुरांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले होते.

ठळक मुद्दे संबंधित बांधकाम पाडुन टाकण्याबाबत १६ नोव्हेंबर २०१८ ला महापालिकेने बजावली होती नोटीस मजुरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असताना काम ठेवले सुरू

पिंपरी : पिंपळे गुरव येथे नदीपात्रालगत शिवमंदिरासमोर सभामंडप उभारणीचे दगडी काम सुरू असताना, अचानक बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. नऊ जण जखमी झाले. या प्रकरणी मजुरांच्या सुरक्षिततेची दक्षता घेतली नाही, म्हणुन मंदिर बांधकामाचा ठेका घेतलेल्या राहुल जयप्रकाश जगताप (वय ३६,रा.बारामती) यांच्यावर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीुनसार, नदीकाठी मंदिराचे सुरू असलेले बांधकाम अनधिकृत असल्याबद्दल महापालिकेच्या बांधकाम परवाना व अतिक्रमण निर्मुलन विभागाने नोटीसव्दारे कळविले होते. संबंधित बांधकाम पाडुन टाकण्याबाबत १६ नोव्हेंबर २०१८ ला महापालिकेने नोटीस बजावली होती. तरी ही ठेकेदाराने मंदिराचे बांधकाम सुरू ठेवले होते. मजुरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असताना काम सुरू ठेवले होते. मजुरांना सेफटी बेल्ट, शेफ्टी बूट, सुरक्षा जाळी अशी कोणतीही सुरक्षा साधने पुरविण्यात आली नव्हती. ही बाब निदर्शनास आल्याने मजुरांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी ठेकेदार जगताप यांच्याविरूद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पिंपळे गुरव येथे मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम सुरू असताना घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये मनतोष संजीव दास (वय ३०, रा. कामगार वसाहत, पिंपळे गुरव), प्रेमचंद शिबू राजवार (वय ३५, कामगार वसाहत) या कामगारांचा समावेश आहे. सिद्धम्मा मानसप्पा पुजारी (वय ३०, रा. गोपीचाळ, खडकी) या कामगार महिलेचा मृत्यू झाला. तर शामोन सरदार, सेवाराम राजकुमार साहू, कृष्णा पवार, कमलेश कांबळे, आयप्पा मल्या सुभंड, धनंजय चंदू धोत्रे, योगेश मच्छिंद्र मासाळकर, कमलेश मालिकराम, अयप्पा मलप्पा सुगड हे मजूर दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वायसीएम तसेच औंध येथील सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा घडून येत आहे.

टॅग्स :pimpale guravपिंपळेगुरवAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस