शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी करणाऱ्या ११ आंदोलक नगरसेवकांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 3:23 PM

महापालिकेतील सह शहर अभियंता आयुब पठाण यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक एकत्र आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

ठळक मुद्देविनापरवाना जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी कारवाई महापालिका पाणीपुरवठा विभागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण

पिंपरी : चिखली, तळवडेसह शहराच्या विविध भागात कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात शुक्रवारी घोषणाबाजी केली. या प्रकरणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह ११ नगरसेवकांवर पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे. विना परवाना जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.  विनापरवाना बेकायदा जमाव जमवुन आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक दत्ता साने, मयुर कलाटे, समीर मासुळकर, जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका वैशाली काळभोर, गीता मंचरकर, सुलक्षणा शिलवंत, पौर्णिमा सोनवणे, अपर्णा डोके आदींचा समावेश आहे.  महापालिकेतील सह शहर अभियंता आयुब पठाण यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक एकत्र आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. चिखली, तळवडेभागासह शहरात ठिकठिकाणी पाणी पुरवठा समस्या भेडसावत आहे. अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाकडून उपाययोजना का होत नाहीत, असा संतप्त सवाल आंदोलक नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या ११ नगरसेवकांविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई केली. पिंपरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाWaterपाणीEmployeeकर्मचारीPoliceपोलिस