शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शाई फेकली म्हणून खूनाचा गुन्हा; राज्यपाल, भाजप नेत्यांवर महापुरूषांच्या अवमानाचा गुन्हा का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 08:53 IST

कोणावरही शाई फेक करणे चुकीचे आहे. त्याचे मी समर्थन करीत नाही

पिंपरी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणा‍ऱ्या कार्यकर्त्यांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, महाराष्ट्रातील महापुरूषांचे व स्त्रियांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल, भाजपचे नेत्यांवर महापुरूषांचा अपमान केला म्हणून गुन्हा दाखल केला जात नाही, असा प्रश्न विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

अजित पवार म्हणाले, ‘‘कोणावरही शाई फेक करणे चुकीचे आहे. त्याचे मी समर्थन करीत नाही. मात्र, चळवळीतून घडलेल्या आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना शाळा बांधण्यासाठी देगणी, वर्गणी, लोक सहभागातून महापुरूषांनी निधी गोळा केला, असे म्हणता आले असते. त्यांनी खांद्यावरील रूमाल काढून त्याची झोळी करीत भीक मागण्याची कृती करून दाखविली. अपमानजनक उद्गार काढले, हे चुकीचे आहे.’’

पवार म्हणाले, शाई फेकीनंतर एका खासगी कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी ‘‘पोलिसांवर कारवाई करू नका, असे वक्तव्य केले. मात्र, काही तासांतच ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच  बातमीसाठी पत्रकार प्रसिद्ध व्यक्ती, नेता, कलाकार, अभिनेता यांच्यावर कॅमेरे लावतात. हिडीओ काढतात. त्यात नवीन काही नाही. त्यामुळे पत्रकारावरही गुन्हा दाखल करणे अयोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप सत्तेत आले. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याच्या घटनेचा राग येऊन ते रस्त्यावर उतरले नाहीत. निवडणुकीत विजय मिळाला म्हणून त्यांनी रस्त्यावर येऊन पेढे वाटले. भाजपची ही दुप्पटी भूमिका बरोबर नाही.’’

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणPoliceपोलिस