वडगाव मावळ : मागील काही वर्षांपासून सासर सोडून माहेरी येऊन राहत असलेल्या नणंदेच्या डोक्यात भावजयीने दगड घातला. यामध्ये नणंद गंभीर जखमी झाली.मीरा सुनील सावंत (वय 30, रा. दिवड, ता. मावळ, जि. पुणे) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गंगुबाई कैलास सावळे (रा. दिवड, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा यांचा मागील आठ वर्षांपूर्वी सुनील यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांनी पतीला दारूचे व्यसन जडले. सुनील वारंवार दारू पिऊन तो मीरा यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असे. दरम्यान मीरा यांना दोन मुले झाली. परंतु सुनील याचे दारूचे व्यसन आणि त्यातून होणारा त्रास कमी होत नसल्याने मीरा यांनी सासर सोडून माहेर गाठले. मागील पाच वर्षांपासून त्या माहेरी त्यांच्या घरी राहत होत्या.माहेरी राहत असताना त्यांच्या भावाची बायको गंगुबाई यांच्यासोबत भांडण होत असे. गुरुवारी रात्री मीरा घरात झोपल्या असताना गंगुबाईने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने मोठा दगड डोक्यात घातला.
भावजयीने दगड मारल्याने नणंद जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 01:12 IST