पिंपरी : जमिनीच्या व्यवहारात एका डॉक्टरची २२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक अनंत कोरहाळे यांच्यासह अंगद नारायण चव्हाण, अमित मनानी, अशोक बागलाणी, प्रदीप वाघमारे, अनुप सिंग, स्वप्नील काटे, भिवा दास, माणिक रसाळ अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. महेश शिवाजी पांढरपट्टे (वय ३३, रा. गणेश हौसिंग सोसायटी, टॉवर लाईन रोड, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी व आरोपी यांच्यात चिखलीतील एका जमिनीबाबत व्यवहार झाला होता. तसेच त्या जमिनीचे खरेदीखतही करण्यात आले होते. दरम्यान, ही जमीन दुसरयाच्या नावावर असल्याचे फिर्यादी यांना समजले. याबाबत फिर्यादीने विचारले असता तुम्हाला दुसरी जागा देतो त्या मोबदल्यात अजून पैसे द्यावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीकडून २२ लाख ५० हजार रुपये घेतले. हा प्रकार १९ मे २०१५ ते २० एप्रिल २०१९ या कालावधीत घडला. दरम्यान, अद्यापही फिर्यादीला जागा अथवा पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फसवणूकप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 20:58 IST
जमिनीच्या व्यवहारात एका डॉक्टरची २२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूकप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल
ठळक मुद्देहा प्रकार १९ मे २०१५ ते २० एप्रिल २०१९ या कालावधीत घडला.