शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सौंदर्यवतींचा रॅपवॉक पिंपरी-चिंचवड महापाैरांच्या मुलाला भोवला, कोविड नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 7:51 PM

कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढला असतानाही साैंर्द्य स्पर्धेचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या महापाैरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढला असतानाही साैंर्द्य स्पर्धेचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या महापाैरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जवाहर मनोहर ढोरे (रा. नवी सांगवी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महादेव मारुती शिंदे (वय ५४, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. जवाहर ढोरे हा महापाैर उषा ढोरे यांचा मुलगा आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे चिंचवड येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मिस पिंपरी-चिंचवड साैर्द्य स्पर्धेचे जवाहर ढोरे यांनी आयोजन केले होते. महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (दि. २२) सायंकाळी ही स्पर्धा पार पडली. कारोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून स्पर्धे दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला. 

दरम्यान स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी रॅम्प वाॅक केले. त्यावेळी महापाैर उषा ढोरे यांनी मास्कचा वापर न करता रॅम्प वाॅक केला. चित्रपट अभिनेत्रीही या वेळी उपस्थित असल्याने प्रेक्षागृहात तोबा गर्दी झाली होती. अभिनेत्री आणि महापाैर यांच्या भोवती मोठा घोळका झाला. घोळक्यातील अनेकांनी मास्कचा वापर केला नाही. तसेच एकत्र येऊन जमाव केल्याने या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याबाबत  ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली. 

अभिनेत्रीवरही कारवाईसाैंर्द्य स्पर्धेला उपस्थित असलेल्या अभिनेत्रीनेही मास्कचा वापर केला नाही. तसेच स्वत:भाेवती घोळका करून घेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळले नाही. त्यामुळे संबंधित अभिनेत्रीवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. प्रेक्षागृहात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस