शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

भाजपाचा भ्रष्टाचार मात्र जनतेवर अधिभार, पाणीपट्टी वाढीविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:09 AM

शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हे सोयीस्कररीत्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे.

पिंपरी : शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हे सोयीस्कररीत्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या भाजपाच्या या पारदर्शक भ्रष्टाचाराचा जनतेवर अधिभार का? असा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला. पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजपाने केलेल्या पाणीपट्टी दरवाढ विरोधात निदर्शने केली.या वेळी महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अल्पसंख्याक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला प्रदेश सचिव बिंदू तिवारी, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैसवाल, एनएसयूआय शहराध्यक्ष विशाल कसबे, ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंखे, ज्येष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, मॅन्युअल डिसुजा आदी उपस्थित होते.साठे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिका आतापर्यंत देशात सर्वांत कमी दराने पाणीपुरवठा करीत होती. प्रस्तावित दरवाढीमुळे देशात सर्वांत महागडा पाणीपुरवठा पिंपरी-चिंचवड मनपा नागरिकांवर लादत आहे. पाच हजार तीनशे कोटींपेक्षा जास्त रुपयांचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे. ४०५ कोटीच्या निविदा प्रक्रियेत ३४ कोटींची बचत केल्याचा अजब दावा आयुक्तांनी केला आहे. वाचवलेली ही रक्कम पाणीपुरवठ्यावर खर्च करावी व नागरिकांना सुविधा द्यावेत. दरवर्षी पाणीपट्टीतून सत्तर कोटींहून जास्त रुपये महापालिकेत जमा होतात. तरीदेखील पाणीपट्टीची अन्यायकारक दरवाढ नागरिकांवर लादली आहे. ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून याला तीव्र विरोध करील.’’>साठे म्हणाले, मागील निवडणुकीत भरघोस आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने एक वर्षाच्या कार्यकालात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पाशवी बहुमतामुळे भाजपामध्ये मस्ती आलेली आहे. ही मस्ती काँग्रेसचे कार्यकर्ते उतरविल्याशिवाय राहणार नाहीत. पाशवी बहुमतापुढे निषप्रभ ठरलेल्या विरोधी पक्षामुळे पिंपरी-चिंचवडच्या जनतेवर चौपट पाणीपट्टी दरवाढ भाजपाने लादला. दिशाभूल करणारी आकडेवारी सादर केली.