शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Positive News : मावळ तालुक्यातील ३४ वर्षीय परिचारिका कोरोनामुक्त आणि इतर तीन जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 17:51 IST

तळेगावसह तालुक्यासाठी दिलासादायक बाब

ठळक मुद्देसंबंधित परिचारिका या शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत माळवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ८४ पैकी २२ जणांचे विलगीकरण

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील तळेगाव स्टेशन येथील पहिल्या कोरोना बाधित ३४ वर्षीय परिचारिकेचा फॉलोअप कोविड १९ चाचणी अहवाल तसेच शहराजवळील माळवाडी येथील दुसऱ्या ३७ वर्षीय कोरोनाबाधित परिचारिकेच्या 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट' मधील तिचा पती व दोन मुलगे अशा तिघांचे कोरोना निदान चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत,अशी माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली. हा अहवाल मंगळवारी (दि. १२) रात्री आला. या अहवालामुळे तळेगावकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.संबंधित परिचारिका या शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत आहेत. तळेगाव स्टेशन येथून त्या कामासाठी जात असत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची सोमवारी (दि. ४) आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात ही महिला पॉझिटिव्ह आढळली. सदरच्या परिचारिकेस ७ मे रोजी औंध येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.विशेष म्हणजे कुठल्याही विशेष उपचाराशिवाय केवळ प्रबळ रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर परिचारिकेने कोरोनावर मात केली आहे. सध्या तरी तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत कोरोनाबाधीत रुग्ण नाही. तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्राचा समावेश कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केले आहे. 

कोरोनाबाधित परिचारिकेच्या कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट निगेटिव्हमाळवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण ८४ पैकी २२ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून ६२ जणांना  होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रशासनाची करडी नजर आहे. माळवाडी येथील परिचारिकेवर पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही परिचारिका शिवाजीनगर येथील खासगी रुग्णालयात सेवेत आहे.माळवाडी येथून त्या कामासाठी जात असत कुटुंबातील पती व दोन मुलगे यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल  करून त्यांची कोरोना निदान चाचणी करून घेण्यात आली. त्यामध्ये त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. माळवाडी आणि परिसर  कंटेन्मेंट झोनमध्ये असून हा भाग प्रशासनाने पूर्ण सील केला आहे. त्याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिक आणि वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माळवाडी आणि परिसरात युद्धपातळीवर घरटी सर्वे चालू आहे. 

टॅग्स :mavalमावळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिलाhospitalहॉस्पिटलCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या