शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पालिका आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियावर फेक मेसेज, पोलिसांत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 00:10 IST

कोरोनासंदर्भात सोशल मीडियावर अनेक फेक संदेश पसरत असून, आज सायंकाळी पिपरी-चिंचवड चे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने एक संदेश पसरविला गेला आहे

पुणे/पिंपरी चिंचवड : कोरोनामुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर खबरदारी घेत असताना, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. सोशल मीडियातून कोरोनाचे विनोद सुरु झालेले आहेत. सोशल मीडियातून अफवा पसरवल्या जात आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड  महापालिका आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियात असाच पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात हवेत औैषध फवारणीचा एक फेक मेसेज फिरवला जात असून, पोलिसांत याबाबत तक्रार देण्यात आली आहे.पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पिंपरीचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने सोशल मीडियावर टाकला गेलेला मेसेज चुकीचा व खोटा आहे, असे महापालिका आयुक्त कार्यालयाने कळविले आहे़ सोशल मीडियावर शुक्रवारी दिवसभर आयुक्तांच्या नावाने मेसेज पसरविला जात होता़ यामध्ये आज रात्री १० नंतर उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये, या काळात कोव्हीड-०१ कीलच्या मृत्यूसाठी हवेत औषधाची फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. असाच मेसेज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांच्या नावाने फिरत असल्याचे शुक्रवारी रात्री निदर्शनात आले. त्यानंतर आयुक्तांनी खात्री करून पोलिसांत तक्रार दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव होत असून, रुग्णाची संख्या १२ वर पोहोचली आहे.  कोरोनासंदर्भात सोशल मीडियावर अनेक फेक संदेश पसरत असून, शुक्रवारी सायंकाळी पिपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने हा संदेश पसरविला गेला.याबाबत श्रावण हार्डिकर म्हणाले, ‘असा कोणताही संदेश मी पोस्ट केला नाही, हा संदेश फेक, फसवा आहे, नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. कोरोना संदर्भातील या संदेशाची माहिती पोलिसांना दिली आहे. चुकीचे संदेश पसरविण्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.'

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेshravan hardikarश्रावण हर्डिकरSocial Viralसोशल व्हायरल