शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

coronavirus : गर्दी टाळण्याच्या आदेशाला भाजपाची केराची टाेपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 19:26 IST

काेराेनाच्या पार्श्वभूमिवर जाहीर कार्यक्रम घेण्यावर बंदी घातलेली असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रम घेत नियमाची पायमल्ली केल्याचे समाेर आले आहे.

पिंपरी :  कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने या आदेशाची पायमल्ली करीत आकुर्डीत रविवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कायदा मोडणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी बंदीचे आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येवू नये. तसेच यापूर्वी देण्यात आली असल्यास ती परवानगी रद्द करण्याचे आदेश साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार कार्यवाही सुरू केली आहे.

मात्र, शिस्तबद्ध मानल्या जाणाऱ्या भाजपानेच या आदेशाचे उल्लंघन केले आहे. आकुर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पक्षाची आढावा बैठक घेतली. त्यास सुमारे शंभर नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार  आणि शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, सरचिटणीस अमोल थोरात, उमा खापरे आदी उपस्थित होते. पक्षाच्या बैठकीत शहर पातळीवरील कार्यकारिणीची निवड या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांना सूचनाही देण्यात आल्या.

असा आहे कायदाराज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३, व ४  मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. शासनाच्या या आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८  नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील