शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

coronavirus: पिंपरी-चिंचवडमध्ये अहवालांची प्रतीक्षा वाढली, २११३ पॉझिटिव्ह, मृतांची संख्या लागली वाढू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 00:06 IST

coronavirus Pimpri-Chinchwad : महापालिका परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत शंभरने कमी झाली आहे. तसेच  कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

पिंपरी : महापालिका परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत शंभरने कमी झाली आहे. तसेच  कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात २ हजार ११३ रुग्ण सापडले असून १ हजार १६१जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पंधरा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ३ हजार ५१० जणांना डिस्चार्ज दिला आहे. अहवालांची प्रतिक्षा वाढली आहे.   २ हजार ०८५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.  (Awaits reports in Pimpri-Chinchwad, 2113 positive, death toll rises)

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २२०० पर्यंत वाढलेली रुग्णसंख्या शंभरने कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ४ हजार ४६४ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ९९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ०८५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ३ हजार ३६० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ३ हजार ५१० जणांना डिस्चार्ज दिला आहे.  कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ४८३ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार २५१ वर गेली आहे. पंधरा जणांचा बळीकोरोनामुळे मृत होणाºयांची संख्या आज वाढली आहे. शहरातील १५ आणि शहराबाहेरील २ अशा एकूण १७  जणांचा बळी घेतला आहे. त्यात शहरातील १० पुरूष आणि ५महिलांचा समावेश आहे. त्यात ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ०१८ वर पोहोचली आहे.  ४२५० नागरिकांना लसीकरण्कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमी अधिक होत आहे. शहरातील महापालिकेच्या ११ आणि खासगी ३९ अशा एकूण ५० केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात ३ हजार ३५२ जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह ४ हजार २८५ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख ३५ हजार ५६१ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड