शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : चिंताजनक! पिंपरी-चिंचवडला पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 16:07 IST

कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहर पोलीस दलात चिंता..

ठळक मुद्देपिंपरी शहरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या झाली सहा

पिंपरी : राज्यभरातील पोलिसांपाठोपाठपिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहर पोलीस आयुक्तालयांर्गत कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २०) दुपारपर्यंत शहर पोलीस दलात कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या सहा झाली आहे.देशभरात पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात एकही पोलिसाला कोरोनाची बाधा झाली नव्हती. मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी काही खासगी रुग्णालयांमध्ये पोलिसांसाठी कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानुसार आजारी असलेले पोलीस तसेच ज्यांना तपासणी करून घ्यायची आहे, अशा पोलिसांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.

यात चाचणी घेण्यात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी (दि. १५) निष्पन्न झाले होते. त्यानंतर एका सहायक पोलीस निरीक्षकाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट सोमवारी (दि. १८) पॉझिटिव्ह आले. तसेच बुधवारी (दि. २०) एका पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहर पोलीस दलात कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या सहा झाली आहे. या संख्येत वाढ होत असल्याने शहर पोलीस दलात चिंता आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस