Corona Virus : पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण कोरोना रुग्णसंख्या ७० हजारांच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 10:54 AM2020-09-20T10:54:28+5:302020-09-20T10:55:02+5:30

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६९,४२३ झाली.

Corona Virus : The total number of corona patients in Pimpri-Chinchwad is on the threshold of 70,000 | Corona Virus : पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण कोरोना रुग्णसंख्या ७० हजारांच्या उंबरठ्यावर

Corona Virus : पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण कोरोना रुग्णसंख्या ७० हजारांच्या उंबरठ्यावर

Next
ठळक मुद्देशनिवारी दिवसभरात ९८४ नवे रुग्ण : ९०३ जण झाले कोरोनामुक्त     

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, रुग्ण संख्या ७० हजारांच्या उंबरठ्यावर आहे. शनिवारी दिवसभरात ९८४ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६९,४२३ झाली. महापालिका हद्दीबाहेरील तीन नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दिवसभरात ९०३ जण कोरोनामुक्त झाले. तर ४११३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३२२९ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात शनिवारी दिवसभरात ५२ रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील २७ जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ११३४ तर महापालिका हद्दीबाहेरील ३६२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच १९६२ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ४०३२ जणांना घरी सोडण्यात आले. तर ५४४४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ११५३ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील ३७८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ५४४३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ४६५ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.

चिंता वाढली...
शहरातील रुग्ण संख्या सप्टेंबरमध्ये ५० ते ६० हजारांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्यापेक्षा १० हजार जास्त रुग्ण आतापर्यंत अर्थात ७० हजारांपर्यंत रुग्ण आढळून आले आहेत. या महिन्यातील आणखी १० दिवसांत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन व नागरिकांची चिंता वाढली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे.

Web Title: Corona Virus : The total number of corona patients in Pimpri-Chinchwad is on the threshold of 70,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.