शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या घराचा परिसर ‘सील’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 16:48 IST

दिल्ली येथील निजामुद्दीन येथे एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या शहरातील २ दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर..

ठळक मुद्देपोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात 

 पिंपरी : दिल्ली येथील निजामुद्दीन येथे एका धार्मिक कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शहरातील काही जणांनी हजेरी लावली होती. यातील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात हे रुग्ण राहत असलेला भाग सील करण्यात आला आहे.   पिंपरी-चिंचवडपोलिसांनी या रुग्णांचे वास्तव्य असलेल्या भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. या भागातील इमारतींमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या भागात इतर नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. येथील कुटुंबांना जीवनाश्यक वस्तू घरपोहच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यांच्या मागणीनुसार त्यांना किराणा, भाजीपाला पुरविण्यात येत आहे.   निजामुद्दीन येथील तबलीगी मरकज येथे शहरातील काही नागरिकांनी हजेरी लावली असून, त्यातील काही जणांचे घशातील द्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील काही नमुने निगेटिव्ह आले आहेत. मात्र दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी शहरातील बारापैकी ११ रुग्णांची तब्बेत ठणठणीत बरी झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. शहरवासीयांसाठी ही बाब दिलासादायक असतानाच नव्याने दोन रुग्ण आढल्याने शहरवासीयांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.     नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या घराचा परिसर ह्यसीलह्ण करण्यात आला आहे. तेथील नागरिकांना जीवनाश्यक वस्तू त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहरवासीयांनी घराबाहेर न पडता प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे.- रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसdelhiदिल्ली