शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरातील परतलेले दोन प्रवासी कोरोना पाॅझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 19:44 IST

उद्योगनगरीत मंगळवारी कोरोनाचे नवे १२१ रुग्ण

पिंपरी : इंग्लंडहून परतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील २१५ प्रवाशांचा शोध घेण्यात आला असून, १६७ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील ११२ जणांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला असून, दोन जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ५३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी होत आहे. मंगळवारी १२१ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६,३१६ झाली. तर दिवसभरात १५६ जण कोरोनामुक्त झाले. १७९० संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १,४०१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.

शहरात मंगळवारी दिवसभरात तीन रुग्ण दगावले. यात महापालिका हद्दीतील एक रुग्ण दगावला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १,७५२ तर महापालिका हद्दीबाहेरील ७२२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. मंगळवारी दिवसभरात १,११० जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १,८२३ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६४४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ७० रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७,३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९३,१०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ८३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात मंगळवारी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पिंपरी येथील ७० वर्षीय महिला, मावळ तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष तसेच खेड तालुक्यातील ७० महिलेचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडshravan hardikarश्रावण हर्डिकर