Corona virus news : पिंपरीत २८१ जण कोरोनामुक्त; १६० नवे कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 21:19 IST2020-12-09T21:18:26+5:302020-12-09T21:19:24+5:30
एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या गेली ९० हजार १७९ वर

Corona virus news : पिंपरीत २८१ जण कोरोनामुक्त; १६० नवे कोरोनाबाधित रुग्ण
पिंपरी : कोरोनाचा विळखा सैल होताना दिसत असून दिवसभरात १६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर २८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात पुरूषांचा समावेश अधिक आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळीनंतर अडीचशेच्यावर गेलेली संख्या या आठवड्यात कमी होऊ लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात ३ हजार ५०१ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ३ हजार ५३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ८६९ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात ३हजार ६८४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ८६९ वर पोहोचली आहे.
..............................
कोरोनामुक्त वाढले
मागील आठवड्यात शहरात रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची वाढू लागली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा दीडपटीने रुग्ण कोरानामुक्त होत आहे. परिसरातील १६० जण कोरोनामुक्त झाले. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९० हजार १७९ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९३ हजार ८१४ वर पोहोचली आहे.
..........
तीन जणांचा बळी
कोरोनाने शहरातील तीन आणि शहराबाहेरील एक अशा एकूण चार जणांचा बळी घेतला आहे. त्यात पुरूषांची संख्या अधिक आहे. मृत होणाऱ्यांची संख्या १ हजार ७१० वर पोहोचली आहे