शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : पिंपरीत शनिवारी नवे १६७ रुग्ण; १५८ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 20:26 IST

शनिवारी दिवसभरात २,८४३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल

ठळक मुद्देदिवसभरात पाच जण दगावले 

पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी होत असला तरी धोका कायम आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत दररोज भर पडतच आहे. शहरात शनिवारी १६७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७,७९० झाली. तर दिवसभरात १५८ जण कोरोनामुक्त झाले. 

शहरात शनिवारी कोरोनाचे पाच रुग्ण दगावले. यात महापालिका हद्दीतील चार तर शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १,७७२ तर महापालिका हद्दीबाहेरील ७३६ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात २,८४३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १,८८९ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. ३,०९४ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २,८३३ जणांना घरी सोडण्यात आले. तर ५७३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ६९ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७४५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९४३१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ८८ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात १७०२ सक्रिय रुग्णकोरोना पॉझिटिव्ह असलेले ५७३ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १,१२९ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण १,७०२ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपेक्षा गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. 

युके स्ट्रेनचा एक अहवाल अद्याप प्रलंबितइंग्लंडहून परतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी सात प्रवाशांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे युके स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले होते. त्यातील तीन अहवाल नकारात्मक आहे. तर तीन अहवाल पाॅझिटिव्ह आले असून तिघांची प्रकृती चांगली आहे. तसेच एक अहवाल प्रलंबित आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर