शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : तळेगाव स्टेशन येथे लग्न सोहळ्याहून परतलेल्या एकाच कुटुंबातील चार जण कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 17:10 IST

खबरदारीचा उपाय म्हणून बाधित कुटुंब राहत असलेल्या कॉलनीतील सोसायटीचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

ठळक मुद्देतळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आजपर्यंत एकूण १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदकोरोनाबाधित कुटुंबाच्या हाय रिस्क आणि लो रिस्क संपकातील व्यक्तींचा शोध सुरू

तळेगाव दाभाडे : लग्न सोहळ्याहून परतलेल्या तळेगाव स्टेशन येथील एकाच कुटुंबातील चारजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचा बुधवारी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली.तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आजपर्यंत एकूण १३ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली असून त्यातील दोघांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली. सद्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत ११ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत . त्यामुळे तळेगाव शहर परिसरात चिंतेचे वातावरण आहे. आज आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब  हे मंगळवारी(दि.२जून) रोजी धुळे येथे एका विवाह सोहळ्याकरिता  गेले होते. ते तळेगाव स्टेशन येथील निवासस्थानी गुरुवारी( दि.४जून) परत आले. हे कुटुंब ज्यांच्यासमवेत धुळे येथे लग्न सोहळ्यास गेले होते  त्या कुटुंबाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तळेगाव स्टेशन येथील  कुटुंबाला त्रास होऊ लागला. त्यांची सोमवारी(दि.१६)  तपासणी केली.  त्यांचा  अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये कुटुंबातील पती (वय३४),पत्नी(वय ३२),मुलगा (वय ११)आणि तीन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. त्यांच्यावर येथील पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगी पश्चात प्रशिक्षण केंद्रातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तळेगाव स्टेशन भागातील आनंद नगर येथील एकाच कुटुंबातील चौघांचा तर गाव भागातील राव कॉलनी येथील एका कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.तळेगाव स्टेशन येथील विद्या विहार कॉलनीतील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित कुटुंब राहत असलेल्या कॉलनीतील सोसायटीचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तर प्रभाग क्रमांक तीनचा काही भाग 'बफर झोन' म्हणून जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली. कोरोनाबाधित कुटुंबाच्या हाय रिस्क आणि लो रिस्क संपकातील व्यक्तींचा शोध सुरू आहे,अशी माहिती डॉ. कानडे यांनी दिली.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न