शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Corona virus : मावळ तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण; परिचारिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 19:27 IST

संबंधित परिचारिका शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत

ठळक मुद्देतळेगाव, स्टेशन भाग आणि तीन किलोमीटरच्या परिसरातील गावे ''कंटन्मेंट झोन '' म्हणून जाहीर तळेगाव स्टेशन परिसर केला सील

तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन येथे एका ३४ वर्षीय परिचारिकेला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तळेगाव शहर परिसरात खळबळ उडाली आहे. मावळ तालुका ऑरेंज झोनमध्ये असून आता या घटनेने तालुक्यातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे.तळेगाव शहर आणि स्टेशन भाग आणि तीन किलोमीटरच्या परिसरातील गावे ''कंटन्मेंट झोन '' म्हणून जाहीर करण्यात आल्याची घोषणा मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी पत्रकार परिषदेत केली. आमदार सुनील शेळके, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, रंगनाथ उंडे आदी यावेळी उपस्थित होते.संबंधित परिचारिका शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत आहेत. तळेगाव स्टेशन भागातील घरून त्या कामासाठी येऊन - जाऊन काम करतात. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची सोमवारी (दि. ४) आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात या महिलेचा तपासणी अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आणि पथकाने तळेगाव स्टेशन परिसर सील केला आहे. सदरच्या महिलेवर औंध येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर महिला ही घरी एकटीच राहते. तिच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टक्टमधील व्यक्तींचा शोध सुरू आहे.तळेगाव शहर, माळवाडी, वराळे, कातवी, वारंगवाडी, आंबी, कोटेश्वरवाडी, सीआरपीएफ कॅम्प, वडगाव नगरपंचायतीच्या दक्षिण भागाचा कंटन्मेंट झोनमध्ये समावेश आहे. तर पाच किलोमीटरच्या बफर झोनमध्ये सोमटणे, इंदोरी, परंदवडी या गावांचा समावेश आहे. कंटन्मेंट झोनच्या पार्श्वभूमीवर तळेगाव स्टेशन आणि गाव भागात सर्व्हे करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. तळेगाव शहररात कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये. लॉकडाऊन व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.

टॅग्स :mavalमावळTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिला