शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पाचवा बळी ; आजपर्यंतची एकूण बाधित रुग्णसंख्या १११ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 20:43 IST

पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार घेणाऱ्या खडकीतील एका पन्नास वर्षीय महिलेचा बुधवारी दुपारी मृत्यू

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत पुण्यापेक्षा कोरोना वाढीचा वेग कमी

पिंपरी : औद्योगिकनगरीतील कोरोनाच्या रूग्णांत चार जणांची भर पडली असून आजपर्यंत एकुण १११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार घेणाऱ्या खडकीतील एका पन्नास वर्षीय महिलेचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एकुण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत पुण्यापेक्षा कोरोना वाढीचा वेग कमी आहे. सामाजिक प्रसार अधिक वाढत असल्याने कंटेन्मेट झोन असलेल्या भागात रूग्ण वाढत आहेत. बुधवारी सकाळी चार रूग्णांची भर पडली आहे. कोरोना बाधित सक्रिय रुग्णांचा आकडा ९६ वर पोहचला आहे. तर आजपर्यंत १११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात बारा पुरूष आणि नऊ महिलेचा समावेश आहे.देहूरोड आणि पुण्यातील रूग्णांचा समावेशमहापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, महापालिकेच्या भोसरीतील रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. आज रूग्णालयात १५३ संशयित रूग्णांना दाखल केले आहे. तर ३५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर १६६ जणांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. हे अहवाल प्रतिक्षेत आहेत.सकारात्मक अहवाल आलेले रूग्ण थेरगाव, रूपीनगर, देहूरोड, पुण्यातील रविवार पेठ येथील आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये चार पुरूषांचा समावेश आहे. त्यात एकाचे वय १ वर्षे, दुसऱ्याचे वय ९ वर्षे, तिसऱ्याचे वय १९ वर्षे, चौथ्या रूग्णाचे वय ३० वर्षे  आहे. कोरामुळे मृत्यू झालेली महिला ही खडकी येथील रहिवाशी असून तिचे वय पन्नास वर्षे आहे. तर आजपर्यंत कोरानामुक्त ३१ जण झाले आहेत.  ...................

चार जण कोरोनामुक्त......कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण येण्याचे प्रमाण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. बुधवारी चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात भोसरी आणि खराळवाडी येथील राहणाऱ्या चार जणांच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात आजपर्यंत एकुण ३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी कोरोमुक्त झालेल्या आणखी चौदा दिवस घरीच रहावे लागणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिला