शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

Corona virus : मुंबईहून मुलीकडे आलेल्या महिलेस कोरोनाची लागण ; आयटीपार्क माण येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 17:03 IST

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आल्याने अडकलेले अनेकजण करत आहेत स्थलांतर

ठळक मुद्देसंपर्कात आलेले तीनजण क्वारंटाईन आयटीनगरीत वास्तव्य करणारे नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर

हिंजवडी : आयटीनगरी माण येथे राहणाऱ्या आपल्या मुलीकडे आलेल्या जेष्ठ महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संपर्कात आलेल्या तीन जणांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिड महिन्यांच्या कालावधीनंतर लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आल्याने काही कारणास्तव अडकलेले अनेकजण स्थलांतर करत आहेत. माणमधील आयटीपार्क फेज तीन हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वास्तव्य करत असणाऱ्या व्यक्तीने गुरुवारी (दि.१४) आपल्या आई वडिलांना मुंबई येथून आपल्याकडे आणले होते. मात्र दोन दिवसांनी आईला त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात तपासणी साठी नेले असता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या घरातील तीन व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांची कोरोना संदर्भात तपासणी केली आहे. मात्र, त्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे चारच दिवसापूर्वी हिंजवडीत सुद्धा आपल्या नातेवाईकांकडे पाहुणा म्हणून आलेल्या जेष्ठ व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. या घटनेनंतर आयटीपार्क परिसरात एकच खळबळ उडाली होती. दोनच दिवसात माण मध्ये पुन्हा अशाचप्रकारे घटनेची पुनरावृत्ती झाल्याने तालुका आरोग्य विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या आवाहनास आयटीनगरीत वास्तव्य करणारे नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दरम्यान आयटीनगरी परिसरात पुणे, मुंबई अथवा इतरत्र प्रवास करून कोणी आल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ आरोग्य विभाग अथवा स्थानिक प्रशासनाला कळवावे असे आवाहन माण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बालाजी लकडे यांनी केले आहे.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसITमाहिती तंत्रज्ञानMumbaiमुंबई