शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, रविवारी दिवसभरात 65 नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 22:35 IST

दिवसभरात १५८ जणांना डिस्चार्ज , दोघांचा बळी

ठळक मुद्देशहरात कोरोना बधितांची एकूण संख्या ७६८ वर

पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा वाढत असून दिवसभरात ६२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.   त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६८ वर गेली आहे. तर आज दिवसात एकच व्यक्ती कोरोनामुक्त झाला आहे. तर आनंदनगर आणि रमाबाई नगरातील दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. २७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात रविवारी दिवसभरात ६० जण तर पुण्यातील दोन असे एकुण ६२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ३३ पुरुष तर २९ महिलांचा समावेश आहे.  पॉझिटिव्ह आढळलेला एक जण पुण्यातील पवनानगर आणि दुसरा मुंबई येथील रहिवाशी आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर, काळेवाडी, पिंपरीगाव, जुनी सांगवी, पाटीलनगर, चिखली, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दापोडी, फुलेनगर,  पिंपरी, अजंठानगर, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, पवनानगर पुणे आणि मुंबई येथील एक रहिवाशी आहे.

झोपडपट्टीतील दोघांचा मृत्यू  आनंदनगर आणि रमाबाई नगरातील दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. आनंदनगर  येथील ५८ वर्ष आणि रमबाईनगरातील ६० वर्षांच्या महिलेस महापालिकेच्या रूग्णालयात दाखल केले होते. त्या दोघांचा आज मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यातील १७ आणि पिंपरीतील १४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरातील ४३८ आणि पुण्यातील ५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत...............१५८ जणांना डिस्चार्जमहापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रविवारी १७७ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या २७९ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच २७० जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये ५७९ जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये १५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये एक जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ४३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये दिघी विजयनगर येथील नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरDeathमृत्यू