Corona Virus : मास्क खरेदी करताय का, कोरोना घरी घेऊन जाताय?; पिंपरीतील रस्त्यावर मास्कची सर्रास 'ट्रायल'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 01:22 PM2020-11-06T13:22:00+5:302020-11-06T13:23:21+5:30

काळजी घ्या, सुरक्षित रहा ..

Corona Virus : Buy a mask, take Corona home ?; Massive 'trial' of masks on Pimpri road | Corona Virus : मास्क खरेदी करताय का, कोरोना घरी घेऊन जाताय?; पिंपरीतील रस्त्यावर मास्कची सर्रास 'ट्रायल'

Corona Virus : मास्क खरेदी करताय का, कोरोना घरी घेऊन जाताय?; पिंपरीतील रस्त्यावर मास्कची सर्रास 'ट्रायल'

Next

तेजस टवलारकर -

पिंपरी : कोरोनाच्या पूर्वी शहरातील मोजक्याच दुकानात मास्क विकण्यासाठी उपलब्ध होते. परंतु मार्च पासून कोरोनाचे संकंट सुरू झाले, आणि शहरातील रस्त्यांवर मास्कचे दुकान मोठ्या प्रमाणावर लागले. रस्त्यांवर लागलेल्या दुकानांमध्ये काही नागरिक मास्क घेण्यासाठी येतात. तेव्हा मास्कची ट्रायल घेतात. ट्रायल केलेला मास्क घेत नाहीत. दुकानदारही तो मास्क वेगळा काढून ठेवत नाही. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचे  रुग्ण वाढण्याचा धोका आहे.

विशेष म्हणजे कशाचीही भीती न ठेवता असे नागरिक मास्कची ट्रायल घेतात. शहरात आता कोरोनाचे  रुग्ण कमी होताहेत. परंतु नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्या वेळ लागणार नाही. सध्या नागरिक विविध प्रकारचे आणि विविध रंगांचे मास्क विकत घेण्यास पसंती देत आहेत. परंतु यात कोरोनाचे गांभीर्य कमी होता कामा नये. शासनाने ठरलेले नियम नागरिकांनी आणि दुकानदारांनी पाळणे गरजेचे आहे.

पिंपरी शहरात पाहाणी केली असता या परिसरात रस्त्यांवर मास्कची दुकाने लागली आहेत. परंतु मास्क उघड्यांवर टागलेले आहेत. काही नागरिक हे मास्कला सर्रास हाल लावतात. कोणताही का‌ळजी घेत नाही. दुकादारही ग्राहकांना काहीच म्हणत नसल्याचे चित्र येथे दिसून आले. दुकानदारांना विचारले असता काही नागरिकच असे करतात, असे त्यांनी सांगितले. या परिसरात अनेर लोक विना मास्क फिरत असल्याचे दिसून आले.
पिंपरी मार्केट या परिसरात कोरोनाचे  रु्गण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. या परिसरात देखील काही लोक मास्कच्या दुकानात विचारपुस करण्यासाठी येतात. मास्क हाल लावतात. दुकानदारही हात लावलेल्या मास्कला वेगळे ठेवत नसल्याचे दिसून आले.  काही नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

या भागात रस्त्यांवर लागलेल्या मास्कची दुकाने कमी प्रमाणात दिसून आली. त्यामुळे साहाजिकच गर्दी कमी होती. त्याचबरोबर नागरिक मास्क लावत असल्याचे दिसून आले. काही दुकांनांमध्ये पाहीणाी केली असता. नागरिक मास्क हाल लावत नाही असे दिसले. तर दुकानदारांनी मास्क झाकुन ठेवले होते. त्याचबरोबर काही ठिकाणी मास्क लाबूनच बघा असे सांगितले जात होते.

 ग्राहकांना काय वाटते?
 मास्कचा वापर कोरोनापासून बचाव करण्यासाठी होणे अपेक्षित आहेत. परंतु सध्या काही लोक फँशन म्हणून मास्कचा वापर करत आहेत. दुकानादारांनी ग्राहकांना मास्कला हात लावू देऊ नये, असे रमेश सुने म्हणाले.

 ज्या मास्कची ट्रायल घेतली जाते. असे मास्क दुकानदारांनी वेगळे काढावे. ते विकू नये. काही लोकांमुळे बाकीच्या नागरीकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता यातून नाकारता येत नाही, असे सचिन पाटील म्हणाले.

.......

 ट्रायल केलेले मास्क विकु नये. नागरिकांनी मास्क घेतांना काळजी घ्यावी. नागरिकांनाही मास्क घेतांना ट्रायल केलेले मास्क घेवू नये.
- डाँ. पवन साळवे,मुख्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका. 

Web Title: Corona Virus : Buy a mask, take Corona home ?; Massive 'trial' of masks on Pimpri road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.