शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

Corona virus : सगळी जबाबदारी प्रशासनाचीच, आपण स्वयंशिस्त पाळणार नाही का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 20:12 IST

नियमांचे उल्लंघन केल्याने संसर्गाचा धोका अधिक

ठळक मुद्दे प्रशासनाकडून अपेक्षा चूक की बरोबर 

पिंपरी : औद्योगिक नगरीतील कोरोनाच्या आकडेवारीने नागरिकांसह प्रशासनाच्या उरात धडकी भरली आहे. सतत वाढणा-या रुग्णांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. रुग्णालयांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. बेड कमी पडत आहेत. अनेक ठिकाणी अपुऱ्या सोयी आहेत. अशी परिस्थिती असताना सगळा भार प्रशासनावर टाकून प्रश्न सुटणार आहे का? याचा विचार नागरिकांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. नियमांचे उल्लंघन करुन फिरत आहे. अशावेळी प्रशासनाकडून किती आणि कोणती अपेक्षा करणार ? हा प्रश्न सध्याच्या परिस्थितीतून समोर आला आहे.       पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा बाधितांची रोजची संख्या शंभराहून अधिक आहे. रोज सरासरी 5 पेक्षा जास्त मृत्यु आहेत. वारंवार पालिका आणि जिल्हा प्रशासन नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करुन देखील नागरिक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले. मात्र यात नागरिकांनी स्वत: शिस्त पाळुन सहकार्य दाखविणे गरजेचे आहे.   

जुलै महिन्यातील लॉकडाऊन दरम्यान दोन हजारांपेक्षा वाहनचालकांवर करण्यात आलेली कारवाई, तर तीन हजार जणांवर खटले दाखल करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगाल्यानंतर नागरिक पोलिसांवरच आगपाखड करतात. परंतु लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना असूनही ते बिनदिक्कतपणे मॉर्निंग वॉक च्या नावाखाली घराबाहेर पडत आहेत. चहाच्या टप-यांबाहेर तरुणाची गर्दी आहे. छोट्या मोठ्या खाद्यपदार्थांच्या दुकानबाहेर नागरिक इभे आहेत. 

  नागरिकांचे चुकते काय ? - कुठलेही कारण सांगून घराबाहेर पडणे - खरेदीच्या नावाने गप्पा मारण्यात वेळ घालवणे - ज्येष्ठांनी आरोग्याच्या नावाखाली संसगार्चा धोका वाढवणे - अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीच्या नावाखाली दुकानाबाहेर गर्दी करणे - भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झालेली झुंबड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसshravan hardikarश्रावण हर्डिकर