Corona virus : पिंपरी शहर परिसरामध्ये सोमवारी ९५९ जण कोरोनामुक्त; ५५४ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 09:15 PM2020-09-28T21:15:36+5:302020-09-28T21:16:15+5:30

शहरात पॉझिटिव्ह रुग्णापेक्षा आज दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona virus : 959 people released from corona in Pimpri city area on Monday; 554 newly affected | Corona virus : पिंपरी शहर परिसरामध्ये सोमवारी ९५९ जण कोरोनामुक्त; ५५४ नवे रुग्ण

Corona virus : पिंपरी शहर परिसरामध्ये सोमवारी ९५९ जण कोरोनामुक्त; ५५४ नवे रुग्ण

Next
ठळक मुद्देदिवसभरामध्ये ४ हजार ०१९ जणांना डिस्चार्ज; १० जणांचा बळी

पिंपरी :  शहर परिसरामध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी दिवसभरामध्ये ५५४ रुग्ण आढळले असून ९५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहर परिसरातील १० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील पंधरा दिवसापूर्वी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत होते. मात्र गेल्या आठवडाभरापासून रुग्णांमध्ये घट झाली आहे. महापालिकेच्यावतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यातून रुग्णांच्या नागरिकांची आरोग्याची माहिती घेतली जात आहे.

 महापालिका परिसरातील रुग्णालयात ३ हजार ५५४ दाखल झाले असून त्यापैकी एन आयव्हीकडे पाठवलेल्या घशातील द्रवांचे नमुन्यांपैकी ३ हजार ४८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ५९१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहे.  दिवसभरामध्ये ४ हजार ०१९ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
...........
 कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली
शहरात पॉझिटिव्ह रुग्णापेक्षा आज दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरामध्ये ५५४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी ९५९ कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६८ हजार २५५ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ हजार ६३३ वर पोहोचली आहे. शहर परिसरातील दहा आणि पुणे परिसरातील पाच अशा एकूण १५ जणांचा बळी घेतला आहे.  मृतामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे.

Web Title: Corona virus : 959 people released from corona in Pimpri city area on Monday; 554 newly affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.