शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

Corona virus : दिलासादायक! पिंपरी-चिंचवड शहरातील ५० हजार रुग्णांनी आतापर्यंत केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:21 PM

शहरातील कोरोना रुग्णांनी केला ६३ हजारांचा टप्पा पार केला

ठळक मुद्देदिवसभरात १६८२ जण कोरोनामुक्त :  नवे १०२८ रुग्ण  

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, रविवारी दिवसभरात १०२८ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३,६२२ झाली. महापालिका हद्दीबाहेरील १० नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दिवसभरात १६८२ जण कोरोनामुक्त झाले. तर ४,१६४ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३३९९ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.शहरात रविवारी दिवसभरात ३० रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील १७ जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १०३९ तर महापालिका हद्दीबाहेरील २९१ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच ३४१६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ४८१८ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६,६१६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ११६४ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील ३०९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ५०,०४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ३९० रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.

उद्योगनगरीची चिंता वाढलीशहरातील कोरोना रुग्णांनी ६३ हजारांचा टप्पा पार केला असून चिंता व्यक्त केली जात आहे. दररोज हजारावर नवे रुग्ण आढळत आहेत. असे असले तरी आजअखेर ५३१३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत २६२०८० संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले असून त्यातील २५१५९० रुग्णांना आजअखेर घरी सोडण्यात आले आहे. तसेच १९५०४२ रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर