शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी शहरात शनिवारी १ हजार १४४ नवीन कोरोना रुग्ण; १४ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:05 IST

पिंपरीत कोरोनाचा विळखा होतोय घट्ट

ठळक मुद्देसव्वा लाख लोकांना डिस्चार्ज

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असला तरी, शनिवारी दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेले रुग्ण जास्त आहेत. दिवसभरात १,१४४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १,१६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७,६६० झाली. शनिवारी दिवसभरात महापालिका हद्दीबाहेरील ९६ नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ३,९९७ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १,९६१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. शहरात शनिवारी दिवसभरात १४ रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील चार जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ८६२ तर महापालिका हद्दीबाहेरील १८२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच ३३८७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ४०४९ जणांना घरी सोडण्यात आले. तर ५७५६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ८६६ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील १८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ३३,२७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह २८७ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.शहरात शनिवारी मृत झालेल्या रुग्णांमध्ये चिखली येथील ४८ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, ८० वर्षीय पुरुष, पिंपरी येथील ६४ वर्षीय महिला, पिंपळे गुरव येथील ८० वर्षीय महिला, खराळवाडी येथील ७० वर्षीय महिला, ७२ वर्षीय पुरुष, निगडी येथील ७८ वर्षीय पुरुष, भोसरी येथील ८८ वर्षीय पुरुष, ८० वर्षीय पुरुष, अहमदनगर येथील ४१ वर्षीय पुरूष, चाकण येथील ३३ वर्षीय पुरुष, येलवाडी येथील ५६ वर्षीय पुरुष, बालेवाडी येथील ६८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

.......

सव्वालाख रुग्णांचा अहवाल निगेटिव्हशहरात आजपर्यंत १,७६,६३३ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. तर १६४०६२ रुग्णांना आजपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १२,८५५८६ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरात आजपर्यंत एकूण ३३,२७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर