शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कोरोना लॉकडाऊन चोरट्यांच्या चांगलाच 'पथ्या'वर;गुन्ह्यांचा छडा लावताना पोलिसांची 'अग्निपरीक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 22:45 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस पडले कमी

ठळक मुद्देकोरोनामुळे पोलिसांना घ्यावी लागते खबरदारी : गेल्या वर्षी २३ टक्के तर यंदा १८ टक्?के गुन्हे उघड

नारायण बडगुजरपिंपरी : कोरोना महामारीमुळे यंदा गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात चोरीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस कमी पडल्याचे दिसून येते. कोरोना महामारी व लॉकडाऊन यामुळे तपासात पोलिसांना अडचणी येत असून ही बाब चोरट्यांच्या पथ्यावर पडली आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत १५ पोलीस ठाणे असून, मोठा औद्योगिक परिसर आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील कामगार, मजूर व उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांचे येथे वास्तव्य आहे. त्याचा फायदा घेऊन गुन्हेगार व चोरट्यांनी देखील त्यांचा मोर्चा उद्योगनगरीकडे वळविला आहे. दरम्यान कोरोना काळात प्रवासाची साधने सहज उपलब्ध होत नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण यंदा कमी झाल्याचे दिसून येते. मात्र त्याच तुलनेत या गुन्ह्यांतील तपासात लॉकडाऊनमुळे अडथळे येऊन गुन्हे उघड होण्याचे प्रमाणही घटले आहे. 

आयुक्तालयाच्या हद्दीत चोरीचे या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान ९१० तर गेल्यावर्षी १७१० गुन्हे दाखल झाले होते. यात गेल्यावर्षी २३ टक्के अर्थात ३८७ गुन्हे उघडकीस आले होते. तर यंदा केवळ १८ टक्के अर्थात १६८ गुन्हे उघडकीस आले आहेत. -----------------लॉकडाऊन शिथील होताच खुनाचे गुन्हे वाढलेयंदा कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. मात्र खुनाच्या गुन्ह्यांबाबत चिंताजनक परिस्थिती आहे. गेल्यावर्षी नऊ महिन्यांत ५२ तर यंदा ५० खून झाले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात या गुन्ह्यांना आळा बसला होता. मात्र लॉकडाऊन शिथील होताच खुनाचे सत्र सुरू झाले होते. तसेच खुनाचा प्रयत्न प्रकरणी गेल्या वर्षी १०० टक्के गुन्हे उघड झाले होते. यंदा मात्र हे प्रमाण ९८ टक्के आहे. -------------------गुन्हे                           २०२०    २०१९खून                               ५०        ५२खुनाचा प्रयत्न               ४१       ७०सदोष मनुष्यवध           ४           १चोरी                            १९०      १७७० दरोडा                          १८          २५मारहाण                      ४४२      ५१९बलात्कार                   १०८       १३४विनयभंग                   २०६      ३४८-----------------लॉकडाऊनमध्येही पोलिसांनी खबरदारी घेत तपासकार्य सुरू ठेवले होते. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले.- आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)------------------------------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसtheftचोरीThiefचोरcorona virusकोरोना वायरस बातम्या