शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांचं 'ते' संभाषण रेकॉर्ड; धक्कादायक माहिती आली समोर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:57 IST

स्थायी समिती अध्यक्षांसह 5 जणांना पोलीस कोठडी

पुणे :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी तक्रारदार ठेकेदाराला ‘ते वर सोळा जणांना द्यावे लागतात’ असे सांगितल्याचे तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे यांना ‘3 टक्क्याऐवजी 2 टक्के करा असे आदेश दिल्याचे संभाषण व्हॉईस रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले आहे. त्यानुसार हे एक प्रकारचे मोठे रॅकेट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे याचा तपास करणे गरजेचे असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितल्यानंतर लांडगे यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेतील पाच जणांना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

नितीन लांडगे यांच्यासह ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे ( स्वीय सहाय्यक वय 56, रा. रामनगर सोसायटी गव्हाणेनगर  भोसरी), अरविंद भीमराव कांबळे ( शिपाई, रा. भीमनगर, पिंपरी), राजेंद्र जयवंत शिंदे ( संगणक ऑपरेटर रा. जय मल्हार, थेरगाव वाकड) विजय शंभुलाल चावरिया (लिपीक, रा. धर्मराजनगर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार हा जाहिरात ठेकेदार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेडील 26 वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी  त्यांनी निविदा भरल्या होत्या. 2019 व 2020 च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र वर्क ऑर्डर निघाली नसल्याने त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोली रकमेच्या बीड अमाऊंटच्या 3 टक्के रक्कमेनुसार 10 लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती 6 लाख रूपयांचे देण्याचे ठरले. त्यातील 1 लाख 18 हजार रूपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले. मात्र 1 लाख 18 हजार रूपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आणि पाच जणांना अटक केली. गुरूवारी ( दि.19) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 

नितीन लांडगे यांच्या मालमत्तेचा शोध सुरू असून, त्यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. त्यांची याव्यतिरिक्तही मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच सापळा कारवाई दरम्यान पिंगळे यांच्याकडे अंगझडती आणि कार्यालय झडती

दरम्यान, 5 लाख 68  हजार 560  रूपयांची रक्कम मिळाली असून, त्यातील 5 लाख 20 हजार रूपये स्थायी समितीच्या सभापतींना देण्यात आल्याचे पिंगळे यांनी सांगितले आहे. या रकमेचा तपास करायचा आहे. राजेंद्र शिंदे यांच्याकडेही 24 हजार 480 रूपयांची रक्कम मिळाली आहे. या सर्व गुन्हयाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील अँड रमेश घोरपडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.----------------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटक