शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

धार्मिक कार्यक्रमावेळी वाद; हातोडा, दगडाने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 15:48 IST

धार्मिक कार्यक्रम आहे, तुम्ही येथे थांबू नका, असे सांगितले असता शिवीगाळ करून हातोडा व दगडाने तसेच हाताने मारहाण केली.

ठळक मुद्देनेहरूनगर येथील प्रकार : पिंपरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : धार्मिक कार्यक्रम आहे, तुम्ही येथे थांबू नका, असे सांगितले असता शिवीगाळ करून हातोड्याने व दगडाने तसेच हाताने मारहाण केली. पिंपरीतील नेहरूनगर येथे गुरुवारी (दि. ३) हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संतोष मारुती लष्करे (वय ४२, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष हनुमंत विटकर (वय २५) व अमित हनुमंत विटकर (वय २८, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेहरूनगर येथे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास धार्मिक कार्यक्रम होत असताना आरोपी संतोष व अमित दोघेही तेथे गेले. तुम्ही येथे थांबू नका, येथे धार्मिक कार्यक्रम चालू आहे,  असे त्यावेळी संजय गुलाब भोसले व विनोद भोसले यांनी आरोपींना सांगितले. तू कोण सांगणार, असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच आरोपी अमित याने विनोद भोसले याला हातोड्याने मारले. सुशिला धोत्रे व आशा भोसले या दोघीही भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील आरोपींनी दगडाने मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या फिर्यादी संतोष लष्करे यांनाही हाताने मारहाण केली. फिर्यादी लष्करे यांना मारहाण होत असताना भांडण सोडविण्यासाठी सुरज शिंदे व आकाश भोसले हे दोघे गेले. त्यांनाही आरोपींनी दगडाने मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस