धार्मिक कार्यक्रमावेळी वाद; हातोडा, दगडाने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:47 PM2019-10-05T15:47:48+5:302019-10-05T15:48:24+5:30

धार्मिक कार्यक्रम आहे, तुम्ही येथे थांबू नका, असे सांगितले असता शिवीगाळ करून हातोडा व दगडाने तसेच हाताने मारहाण केली.

Controversy during religious events; Hammer, stone beating | धार्मिक कार्यक्रमावेळी वाद; हातोडा, दगडाने केली मारहाण

धार्मिक कार्यक्रमावेळी वाद; हातोडा, दगडाने केली मारहाण

Next
ठळक मुद्देनेहरूनगर येथील प्रकार : पिंपरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : धार्मिक कार्यक्रम आहे, तुम्ही येथे थांबू नका, असे सांगितले असता शिवीगाळ करून हातोड्याने व दगडाने तसेच हाताने मारहाण केली. पिंपरीतील नेहरूनगर येथे गुरुवारी (दि. ३) हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संतोष मारुती लष्करे (वय ४२, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष हनुमंत विटकर (वय २५) व अमित हनुमंत विटकर (वय २८, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहरूनगर येथे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास धार्मिक कार्यक्रम होत असताना आरोपी संतोष व अमित दोघेही तेथे गेले. तुम्ही येथे थांबू नका, येथे धार्मिक कार्यक्रम चालू आहे,  असे त्यावेळी संजय गुलाब भोसले व विनोद भोसले यांनी आरोपींना सांगितले. तू कोण सांगणार, असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच आरोपी अमित याने विनोद भोसले याला हातोड्याने मारले. सुशिला धोत्रे व आशा भोसले या दोघीही भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील आरोपींनी दगडाने मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या फिर्यादी संतोष लष्करे यांनाही हाताने मारहाण केली. फिर्यादी लष्करे यांना मारहाण होत असताना भांडण सोडविण्यासाठी सुरज शिंदे व आकाश भोसले हे दोघे गेले. त्यांनाही आरोपींनी दगडाने मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Controversy during religious events; Hammer, stone beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.