शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

लोकप्रतिनिधीच ठेकेदार; कंत्राटदारीवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 3:16 AM

औद्योगिक क्षेत्रात पूर्वीपासून कामगार विरुद्ध मालक असा संघर्ष सर्वज्ञात आहे. त्यांच्यातील वादातून औद्योगिक शांततेला बाधा पोहोचत असल्याचे प्रकार घडू लागल्याने औद्योगिक कलह कायदाही अस्तित्वात आला.

- संजय मानेपिंपरी : औद्योगिक क्षेत्रात पूर्वीपासून कामगार विरुद्ध मालक असा संघर्ष सर्वज्ञात आहे. त्यांच्यातील वादातून औद्योगिक शांततेला बाधा पोहोचत असल्याचे प्रकार घडू लागल्याने औद्योगिक कलह कायदाही अस्तित्वात आला. आता मात्र औद्योगिक शांततेला बाधा पोहोचविण्याचे वेगळेच प्रकार घडू लागले आहेत. कंत्राट मिळविण्यासाठी उद्योजकांवर दबाव आणण्याचे प्रकार घडत आहेत. एवढेच नव्हे तर कंत्राट आपल्यालाच मिळावे, यासाठी कंत्राटदारसुद्धा एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. कंत्राटदारीत आता कामगारनेते आणि राजकारणी यांनी शिरकाव केला असल्याने कंत्राटदारीतील गुन्हेगारीत औद्योगिक क्षेत्रात अशांतता वाढली आहे.पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडी या परिसरात औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला आहे. कामगारांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरातील अनेक उद्योग चाकण येथे नव्याने विकसित झालेल्या आद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित झाले. औद्योगिक पट्टयात अनेक उद्योग नव्याने सुरू झाले. औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेहमीच्या कंत्राटदारांऐवजी कंपन्यांचे दुसऱ्याच ठेकेदारांचा औद्योगिक क्षेत्रात शिरकाव झाला.कामगारनेते झाले कंत्राटदारकामगारांच्या न्याय, हक्काचा लढा देणारे काही कामगारनेते ठेकेदार बनले. एकीकडे कामगारनेते म्हणून मिरवायचे, दुसरीकडे कंपनी मालकाकडून त्यांनीच कामाचा ठेका मिळवायचा. कामगारांसाठी लढा देणाºया कामगार नेत्यांनीच गेल्या काही वर्षांत कंत्राटदारीच्या माध्यमातून कामगारांच्या शोषणाचे काम केले आहे. कामगारनेत्यांचे कंत्राटदारांमध्ये रूपांतर झाल्याने कामगार चळवळीची पीछेहाट झाल्याचे जाणवू लागले आहे. गुंड प्रवृत्तीचे काहीजण राजकारण्यांच्या पाठबळामुळे औद्योगिक क्षेत्रात ठेकेदार म्हणून वावरू लागले आहेत.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीकामगार नेतेच कंत्राटदार झाले असताना, राजकारण्यांनीही औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटदारीकडे लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत एखाद्या पदावर काम करण्याची संधी मिळाली तरी पैसे कमावण्याचे साधन म्हणून औद्योगिक क्षेत्रातील ठेकेदारीला प्राधान्य दिले जात आहे. राजकीय दबावतंत्राचा अवलंब करून कंपन्यांतील कंत्राट अनेकांनी मिळविले आहे. कार्यकर्त्यांचे पुनर्वसन या उद्देशाने काही राजकारणी मंडळी कंपनी मालकांवर दबाव आणून कंत्राट देण्यास भाग पाडतात. औद्योगिक कंपन्या म्हणजे राजकारण्यांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटू लागली आहे.गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून उद्योजकांना त्रास दिला जात आहे. कंपनीतील भंगारमाल, कॅन्टीन, वाहतूक सुविधा, कामगारपुरवठा याचे कंत्राट आम्हालाच द्यावे, अशी दमदाटी कंपनी मालकांना केली जाते. कंपनी मालकाकडून प्रतिसाद न मिळाल्यास त्यांना धमकावले जाते. कंपनीचे, मालवाहू वाहनांचे नुकसान करण्याची धमकी दिली जाते. व्यवसाय करायचा असल्याने कोणाशी वाद नको, या भावनेतून उद्योजक हा त्रास सहन करीत आहेत. पोलिसांकडे कोणाची तक्रार द्यायची, तर वैर पत्करण्याची वेळ येणार या भीतीने कोणीही उद्योजक तक्रार देण्यास पुढे येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. - गोविंद पानसरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळ

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड