शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

दूषित पाणीपुरवठाप्रश्नी अधिकाऱ्यांना घेराव : दिघीतील कृष्णानगरमधील समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 19:10 IST

दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठा प्रश्नी गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात दाखल झाले.

ठळक मुद्देसारथीवरील तक्रार बंद केल्याने नागरिकांकडून संताप नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या सारथी योजनेवर तक्रार दाखल लहान मुलांना पोटदुखी, डायरीला, थंडीतापाची लागण होऊन वृद्धांनासुद्धा शारीरिक व्याधी त्रासदायक

दिघी : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने तक्रार करूनही दखल न घेण्यात आल्याने दिघीच्या कृष्णानगर येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अखेरीस महापालिका आयुक्तांनाच याबाबत विचारणा करण्यासाठी काही नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय इमारतीत दाखल झाले. मात्र आयुक्त नसल्याने नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रश्नी घेराव घातला. दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन उपाययोजना का करण्यात आली नाही, असा जाबही संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी या वेळी विचारला.दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी भोसरीतील ई प्रभाग विभागीय पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तसेच नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या सारथी योजनेवर तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे नियमानुसार सारथीवर आलेल्या नागरी समस्या एक महिन्याच्या आत सोडवून तक्रारदारांचा अभिप्राय घेतला जातो. नंतरच ती तक्रार बंद केली जाते. असा स्पष्ट नियम महापालिकेने केला असला तरी दिघीतील कृष्णानगर भागातील रहिवाशांनी महिन्यापूर्वी दाखल केलेली दूषित पाणी समस्येची तक्रार सोडवली तर नाहीच शिवाय दाखल केलेली तक्रार कुठलाही अभिप्राय न घेता बंद करण्यात आली. ही माहिती जेव्हा नागरिकांना समजली तेव्हा नागरिकांनी थेट आयुक्तांना जाब विचारण्याची आक्रमक भूमिका घेतली. दूषित पाणीपुरवठा प्रश्नी गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात दाखल झाले. मात्र त्या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांच्या कक्षात नव्हते. कामानिमित्त आयुक्त बाहेर गेले होते. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता आयुब पठाण, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, उप कार्यकारी अभियंता दवंडे या संबंधित अधिकाºयांना घेराव घातला. दूषित पाणीपुरवठा होत असून, त्याबाबत तक्रार करून महापालिकेने उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी जाब विचारला. परिसरातील पाणी समस्येचा मुद्दा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. महापालिकेच्या वतीने परिसरात कलेल्या चोवीस तास पाणी योजनेचे काम झाल्यापासून तक्रारी वाढल्याचे नागरिक सांगतात. कृष्णानगर भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन अनेक साथीचे रोग पसरत आहेत. लहान मुलांना पोटदुखी, डायरीला, थंडीतापाची लागण होऊन वृद्धांनासुद्धा शारीरिक व्याधी त्रासदायक ठरत आहेत. कित्येक दिवसांपासून परिसरातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांनी योग्य प्रकारे लक्ष घालावे यासाठी अनेकदा नागरिकांनी समस्यांची गाºहाणी मांडत समस्या सोडविण्याची विनंती केली. मात्र ही गंभीर समस्या एक महिन्यानंतरही कायम आहे तशीच असल्यामुळे नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ प्रशासनाने आणली असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. महापालिकेचा पाण्याचा टँकर अनेकदा फोन केल्यास कधीतरी येत आहे. अनेक नागरिक स्वत:च्या खचार्ने खासगी टँकर मागवत आपली तहान भागवित आहेत. दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार कृष्णानगरमधील नागरिकांनी एक महिन्यापूर्वी केली होती. महिना संपल्यामुळे समस्या न सोडवताच सदर तक्रार बंद केल्याने रवी चव्हाण, सिकंदर मनियार, आनंद पाटील, चंद्रकांत देशमुख, शरद पाटील, डॉ. मधुकर गावंडे, काशिनाथ जाधव, अनिल गायकवाड, गुलाब हुसेन शिलेदार, केशव वाघमारे, मंगेश कारले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूषित पाणीपुरवठा प्रश्नी निवेदन दिले..............................दिघीमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.  यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांच्याकडून माहिती घेतली आहे. तेथील दूषित पाणीपुरवठा होत असलेली दहा ते पंधरा जोड बंद करण्यात आले आहेत. परत त्या परिसरात खोदकाम करून समस्या लवकर सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीचे काम सुरू केले आहे. तक्रार बंद का करण्यात आली याचे कारण कार्यकारी अभियंता यांना मागितले आहे.   - आयुब पठाण, मुख्य कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

टॅग्स :dighiदिघीWaterपाणीHealthआरोग्य