पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 12:43 IST2018-01-30T12:41:37+5:302018-01-30T12:43:40+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर ८० रुपयांहून जास्त झाला आहे. याच्या निषेधार्थ निगडीत काँग्रेसतर्फे सायकल रॅली काढण्यात आली.

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची सायकल रॅली
ठळक मुद्देसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर ८० रुपयांहून जास्तकाँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत स्वत:ची सायकल घेऊन झाले सहभागी
पिंपरी चिंचवड : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर ८० रुपयांहून जास्त झाला आहे. याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज मंगळवारी (दि. ३० जानेवारी) सकाळी ११ वाजता निगडीतील भक्ती शक्ती चौकातून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा देत सायकल रॅली काढण्यात आली.
काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होण्यासाठी स्वत:ची सायकल घेऊन सहभागी झाले.