शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच जागांवर काँग्रेसचा दावा, निवडणुकांसाठी चाचपणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 01:02 IST

लोणावळा : कार्यप्रणालीविषयी चर्चा

लोणावळा : पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील ११ विधानसभा आणि अडीच लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील काँग्रेसपक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर लोणावळ्यात नुकतेच पार पडले.

लोणावळ्यात पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिरात काँग्रेस पक्षाची विचारधारा, पक्षाची कार्यप्रणाली, उद्देश, पक्षाची जनआंदोलन, ६० वर्षांमध्ये काँग्रेसने देशाच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या कार्यपद्धती आणि विचारधारेतील फरक याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या शिबिराला पक्षाच्या राज्यच्या सहप्रभारी सोनल पटेल, प्रशिक्षण शिबिराचे मुख्य संयोजक रामहरी रुपनवर, समन्वयक यशवंत हप्पे, मुख्य प्रशिक्षक राजीव साहू, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, अ‍ॅड. सोमनाथ दौंडकर, जिल्हा समनव्यक निखिल कवीश्वर, शहराध्यक्ष विलास बडेकर, माऊली दाभाडे, दत्तात्रय गवळी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शिबिराच्या समारोप दरम्यान घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोनल पटेल यांनी सदर प्रशिक्षण शिबिर घेण्यामागचा उद्देश सांगितला. या वेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी समस्या मांडल्या.काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संभाव्य आघाडीत जिल्ह्यातील काही जागांबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ११ विधानसभा आणि अडीच लोकसभेच्या जागा लढविण्याची ताकत काँग्रेस मध्ये असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष जगताप यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसlonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड