शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पिंपरी-चिंचवडमध्ये 'चिखल फेको' आंदोलन

By विश्वास मोरे | Updated: June 21, 2024 16:11 IST

अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली. घोषणाबाजी केली....

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे युती सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक चिखल फेक आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली. घोषणाबाजी केली. 

आंदोलनात कविचंद भाट, अमर नाणेकर, विश्वनाथ जगताप, माऊली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, शामला सोनवणे, बाबू नायर, शहाबुद्दीन शेख,  हरीश डोळस, बाबा बनसोडे, जुबेर खान, भाऊसाहेब मुगुटमल, सचिन कोंढरे, मयूर जयस्वाल, गौरव चौधरी, वसंत वारे, सोमनाथ शेळके, वाहब शेख, ॲड. अशोक धायगुडे, ॲड. अनिकेत रसाळ, उमेश बनसोडे आदी उपस्थित होते.

डॉ. कैलास कदम म्हणाले, राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, युवक, महिला, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. पुरोगामी महाराष्ट्रात भाजप सरकार समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे.

राज्यातील सर्वसामान्य नागरिक या सरकारवर चिखल फेक करून सरकारचा तीव्र निषेध करीत आहे.  मागील दहा वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती बंद केली आहे. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ज्या परीक्षा घेतल्या त्यात पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे तरी त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही. सरकार किमान हमीभाव देत नाही.'

महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बियाणांचा काळाबाजार, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. तरुणींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे, कमिशन घेणे एवढेच काम करत आहे. राज्यातील महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार घरी पाठवणार आहेत असेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी