शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

‘प्रलंबित मागण्या पूर्ण करा’; बजाज आॅटोच्या कामगारांचे आकुर्डीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 3:46 PM

बजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण येथील बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे. तसेच प्रलंबित वेतनकरार करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २९ जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय विश्वकल्याण कामगार संघटनेने घेतला आहे.

ठळक मुद्देआकुडीर्तील शहीद दत्तात्रय पाडाळे यांच्या पुतळ्याजवळ संघटनेचे आंदोलनकंपनी व्यवस्थापनास यापूर्वीच दिले आंदोलन करणार असल्याबाबतचे पत्र

पिंपरी : बजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण येथील बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे. तसेच प्रलंबित वेतनकरार करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २९ जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय विश्वकल्याण कामगार संघटनेने घेतला आहे. आकुडीर्तील शहीद दत्तात्रय पाडाळे यांच्या पुतळ्याजवळ संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे.आंदोलनात अध्यक्ष दिलीप पवार तसेच जनरल सेक्रेटरी बाळासाहेब थोरवे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले आहेत. कामगारांच्यावतीने या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. आंदोलन करणार असल्याबाबतचे पत्र कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब थोरवे यांनी कंपनी व्यवस्थापनास यापूर्वीच दिले आहे. बजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण युनिटमध्ये विश्वकल्याण कामगार संघटना कार्यरत आहे. एप्रिल २०१६ ते २०१९ या कालावधीतील वेतनकराराबाबत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्या. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून समाधानकारक निर्णय घेतला जात नाही. मान्यताप्राप्त संघटनेला विचारात न घेता, परस्परपणे चाकण येथील कामगारांना वेतनवाढ देण्याचा एकतर्फी निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला, असा कामगारांचा आरोप आहे. वेतनवाढीचा निर्णय मान्यताप्राप्त कामगार संघटनेशी विचारविनिमय करून घ्यावा. त्याचबरोबर बडतर्फ कामगारांना कंपनीने पुन्हा कामावर रूजू करून घ्यावे, या मागण्यांकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :akurdiआकुर्डीChakanचाकणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbajaj automobileबजाज ऑटोमोबाइल