ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:47 AM2017-11-20T11:47:48+5:302017-11-20T11:51:16+5:30

जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़

Subhash Deshmukh's assurance will not take one-off decision in sugarcane price; factories will hold meeting in two days | ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार

ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सूचनेने सहकारमंत्री पंढरीतवजन काट्यामध्ये शेतकºयांची फसवणूक होऊ नयेजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि २०  : जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़
तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, तालुकाध्यक्ष नवनाथ माने, चंद्रकांत बागल हे गेल्या ९ दिवसांपासून उपोषण करीत आहेत़ त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख आले होते़ त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना हे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले़ यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, मी शेतकरी संघटनेच्या सूचनेनुसार वजन काट्यामध्ये शेतकºयांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नेमले आहे़ मी कारखानदारांना एफआरपीनुसार दर द्यावा यासाठी सूचना करु शकतो; मात्र त्यांना जादा दर द्या, म्हणून दबाव टाकू शकत नाही. त्यामुळे  मधला मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखानदारांची दोन दिवसात बैठक लावून योग्य तो निर्णय जाहीर करु, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिले. 
-----------------
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेने सहकारमंत्री पंढरीत
उसाला पहिली उचल २७०० रुपये मिळावी, यासाठी बाजीराव विहीर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती़ यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला उपोषणकर्त्यांची भेट घेण्यास सांगितले़ त्यांच्या सूचनेनुसार मी आज आपली भेट घेतल्याचे सुभाष देशमुख यांनी दिली.
--------------
उपचार घेण्यास तयार
दोन दिवसात कारखानदार, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन ऊसदराविषयी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी केवळ उपचार घेण्यास सहमती दर्शविली आहे; मात्र ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले़ 
----------------
राज्य व जिल्हा पातळीवर बैठक झाली आहे. त्यामध्ये अनेक जिल्ह्यातील उसाच्या दराचा प्रश्न मार्गी लागला आहे, परंतु सोलापूर जिल्ह्याचा प्रश्न सुटला नाही. मी जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- सुभाष देशमुख
सहकारमंत्री

Web Title: Subhash Deshmukh's assurance will not take one-off decision in sugarcane price; factories will hold meeting in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.